Vat audit date extended up to 28th feb (Maharashtra)

Loading

Vat audit date extended up to 28th feb (Maharashtra)

अधिसूचना


वित्त विभाग

मॅडम कामा रोड

हुतात्मा राजगुरू चौक

मंत्रालय मुंबई.

 

 

क्र मुवक १५१९/क्र. ०२/ कारधान -१. – ज्याअर्थ, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली आहे कि, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ मध्ये तात्काळ सुधारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२(२००५ चा महा.९) चा कलाम ८३ चा पोट-कलम (४) च्या परंतुकांनुसार सादर नियमांना पूर्ण प्रसिद्धी देण्याची अट पाळण्याची गरज नाही;


म्हणून, उक्त अधिनियमांच्या कलम ८३ चा पोट-कलम (४) चा परंतुकासह, पोट-कलमे (१) आणि (२) चा शक्तींचा वापर करून या संदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ मध्ये आणखी सुधारणा करीत आहे, म्हणजेच :-

१. या नियमांना महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (सुधारणा) नियम, २०१९ असे संबोधण्यात यावे.

२. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ नियम ६६ मध्ये, “अखेरीपरून ९ महिने १५

 

दिवसाच्या आत” या शब्द ऐवजी “लगतच्या पुढील वर्षाच्या २८ फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी” हे शब्द व अंक दाखल करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचा आदेश नुसार व नावाने ,


ज. वि . दीपटे
शासनाचे उप-सचिव

Menu